Pratap Sarnaik : उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

06 Feb 2026 19:36:34
Pratap Sarnaik

मुंबई : (Pratap Sarnaik) “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील.दैनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे, अशा तक्रारी असतात. यासाठी आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी." असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले.
 
मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.(Pratap Sarnaik)
 
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, "एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. त्याचबरोबर, प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे आहे."(Pratap Sarnaik)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसंदर्भातील वादविवाद निरर्थक 
 
"प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल आहे. वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी आहे. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो." ही बाब गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले.
 
"एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज असून. प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी, हाच पुढील वाटचालीचा मंत्र आहे." असे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्पष्ट केले.
 
 
Powered By Sangraha 9.0