मुंबई : (Sayyed Baba Dargah) उत्तर प्रदेशच्या इटावा येथील सय्यद बाबा दर्गा (Sayyed Baba Dargah) वन विभागाच्या जमिनीवर असल्याचे आढळल्यानंतर यावर कारवाई केली जाणार की वन विभागाकडून दिलासा मिळणार याची सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी इटावा वन विभागाच्या सामाजिक वनीकरण न्यायालयात केली जाणार आहे. दि. ०५ रोजी झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला आहे.(Sayyed Baba Dargah)
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या आयजीआरएस या पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत वन विभागाच्या परिसरात असलेल्या सय्यद बाबाच्या दर्ग्याबाबत (Sayyed Baba Dargah) आक्षेप घेण्यात आला होता. तक्रारीनंतर वन विभागाने कारवाई केली आणि चौकशी सुरू केली.
सुरुवातीच्या तपासात हा दर्गा वन विभागाच्या जमिनीवर असल्याचे आढळून आले. त्यानंतर ते बेकायदेशीर बांधकाम मानले गेले आणि कारवाई सुरू करण्यात आली. यावर तेथील काम पाहणारे फजले इलाही यांनी दावा केला की, हा दर्गा (Sayyed Baba Dargah) शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि दूरदूरहून लोक यात्रेसाठी येत असतात.
बधपुरा परिसरातील वनक्षेत्रपाल अशोक शर्मा यांनी सांगितले की, तपासात स्पष्टपणे दिसून आले की सय्यद बाबा दर्गा (Sayyed Baba Dargah) कोणत्याही वन विभागाच्या नकाशावर सूचीबद्ध नाही. येथे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी वन विभागाकडून कधीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या आधारे वन विभागाने नोटीस बजावली आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
वन विभागाने दर्ग्याचे (Sayyed Baba Dargah) काम पाहणारे फजले इलाही यांच्याकडून जमीन आणि बांधकामाची कागदपत्रे मागितली. कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी झाल्यामुळे विभागाने पाडकामाची नोटीस बजावली. यावर फजले इलाही आणि त्यांच्या वकिलाने अतिरिक्त वेळ मागितला, जो न्यायालयाने मान्य केला. पुढील सुनावणी आता १६ फेब्रुवारी रोजी होईल.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.