CM Devendra Fadnavis : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसंदर्भातील वादविवाद निरर्थक

06 Feb 2026 19:03:11
CM Devendra Fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसंदर्भातील वादविवाद निरर्थक असून प्रत्येकजण स्वत:चे राजकारण करत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.(CM Devendra Fadnavis)
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसंदर्भात जो काही वादविवाद होतो आहे, तो निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ यात स्वत:चे राजकारण पाहत असून हे अतिशय चुकीच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि मोठे नेते अजित पवार दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले. पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्या माध्यमातून जे काही राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे ते चुकीचे आहे. अशा प्रकारचे खालचे राजकारण बंद झाले पाहिजे,” असे ते (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
 
हेही वाचा : Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही; अजितदादांच्या...
 
ते (CM Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, “आज आम्ही काही महत्वाचे सामंजस्य करार केले आहेत. विशेषत: महिंद्रा अँड महिंद्राशी केलेला सामंजस्य करार अतिशय महत्वाचा आहे. पहिल्यांदाच विदर्भात नागपूरमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील गुंतवणूक आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक आणि पुढच्या पीढीला उपयुक्त कार असून त्याचा कारखाना इथे सुरु होतोय. त्यात ईव्ही कार, नेक्स्ट जेन कार आणि ट्रॅक्टर अशा गोष्टी असतील. हा महिंद्राचा सगळ्यात मोठा कारखाना असेल. यासोबतच ते छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्येसुद्धा गुंतवणूक करणार आहेत. जवळपास १५ हजार कोटींची ही गुंतवणूक असून आम्ही त्यांना १६०० एकर जागा देतो आहोत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे."(CM Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0