कोल्हापूर: (Ruparani Nikam) कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी महायुतीच्या भाजप उमेदवार रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे या निवडीची घोषणा केली. रुपाराणी निकम यांना एकूण ४६ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांना ३५ मते मिळाली. (Ruparani Nikam)
हेही वाचा: मनसेची धावाधाव
या निवडीसह कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली असून, भाजपने आणखी एका महत्त्वाच्या शहरात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मतमोजणी पूर्ण होताच भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात शक्तीप्रदर्शन करत जल्लोष केला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कोल्हापुरातील या विजयामुळे राज्यभरात सुरू असलेल्या महापौर निवडणुकांमध्ये महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Ruparani Nikam)