मुंबई: (Lucky Oberoi) पंजाबच्या जालंधर शहरात शुक्रवार, ६ फेब्रुवारी पहाटे आम आदमी पार्टीचे नेते लकी ओबेरॉय यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. जालंधरच्या मॉडेल टाऊन परिसरात ही थरारक घटना घडली. (Lucky Oberoi)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकी ओबेरॉय हे त्यांच्या थार गाडीत बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. हल्लेखोरांनी एकूण १६ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ५ गोळ्या लकी ओबेरॉय यांना लागल्या. गोळीबाराचा मोठा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिक भीतीने सैरावैरा धावू लागले, तर आजूबाजूच्या दुकानदारांनी तातडीने दुकाने बंद केली. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले. (Lucky Oberoi)
गंभीर जखमी अवस्थेत लकी ओबेरॉय यांना प्रथम जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. (Lucky Oberoi)
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा वैयक्तिक वैर किंवा राजकीय कारणांच्या शक्यतेने तपास केला जात असून सर्व अँगलने चौकशी सुरू आहे. लवकरच आरोपींचा पर्दाफाश केला जाईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. (Lucky Oberoi)