Deva Sharif Dargah : देवा शरीफ दर्ग्यात हिंदू तरूणाला मारहाण

कपाळावर टिळा धुण्यास भाग पाडले

Total Views |
Deva Sharif Dargah

मुंबई : (Deva Sharif Dargah) कपाळावर टिळा लावल्याने उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील देवा शरीफ दर्ग्यात (Deva Sharif Dargah) एका हिंदू तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. परिसरातील मुस्लिम दुकानदारांनी त्याला टिळा धुण्यास भाग पाडत बेदम मारहाणही केली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.(Deva Sharif Dargah)
 
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोतवाली परिसरातील दशराबाग वॉर्डमधील रहिवासी हरीश शर्मा हे त्यांच्या मुस्लिम शेजारी आयेशा बानोसोबत दर्ग्यात चादर अर्पण करण्यासाठी गेले होते. आयेशा चादर अर्पण करण्यासाठी आत गेली तेव्हा हरीश बाहेर होता. तिथे उपस्थित असलेल्या एका मुस्लिम दुकानदाराने त्याला जाण्यापासून थांबवले.(Deva Sharif Dargah)
 
हेही वाचा : Sayyed Baba Dargah : इटाव्यातील प्रसिद्ध सय्यद बाबा दर्गा वन विभागाच्या जमिनीवर 
 
त्याचबरोबर त्या दुकानदाराने 'पंडित इथे काय करतोय' असे म्हणत त्याला मारहाण केली. त्यानंतर त्या तरुणाला जवळच्या दुकानात नेण्यात आले आणि त्याच्या कपाळावरील टिळा पाण्याने धुण्यास भाग पाडले. पीडित हरीश शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, या घटनेदरम्यान त्याच्यावर अपमानास्पद वर्तन आणि शारीरिक हल्ला करण्यात आला.(Deva Sharif Dargah)
 
देवा ठाण्याचे प्रभारी अजय कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे आणि व्हायरल व्हिडिओसह सर्व पुरावे तपासले जात आहेत.(Deva Sharif Dargah)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.