इस्लामाबाद: (Explosion At Islamabad) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका शिया मशिदीत शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी भीषण स्फोट झाला आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, स्फोटात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत (Explosion At Islamabad)
शुक्रवारचा नमाज पठण झाल्यानंतर इस्लामाबादच्या तरलाई परिसरात हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोट इतका तीव्र होता की परिसरात एकच खळबळ उडाली. (Explosion At Islamabad)
घटनेनंतर तातडीने पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. स्फोटानंतर इस्लामाबादमध्ये सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. स्फोटामागील नेमके कारण आणि हल्ल्याचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नसून, सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू आहे. (Explosion At Islamabad)