मुंबई : (Revanth Reddy) हैदराबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी केलेल्या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली. त्यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत केलेल्या विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आलेत. त्यांनी आपल्या भाषणात तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार अल्पसंख्याकांच्या पाठिंब्याने सत्तेत आल्याचे सांगत गरज पडल्यास मुस्लिम लोकसंख्येचा संपूर्ण डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यास राज्य सरकार तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुसलमानांना ४ टक्के आरक्षणाच्या प्रकरणासंदर्भात त्यांनी हे विधान केल्याचे दिसतेय.(Revanth Reddy)
अल्पसंख्याकांचे समर्थन, हेट स्पीचविरोधी कायदा आणि मुस्लिम आरक्षण या मुद्द्यांवर उघडपणे भूमिका मांडत रेवंत रेड्डी यांनी राज्यात द्वेष पसरवणाऱ्या भाषणांवर (हेट स्पीच) आळा घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याची घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले, हा कायदा राज्य विधानसभााच्या आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. देशात शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी अशा भाषणांवर कडक कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी त्यांनी जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचे आभार मानले. मलकाजगिरी लोकसभा निवडणूक तसेच तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जमीयत उलेमा-ए-हिंद यांनी दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केल्याचे दिसून आले.(Revanth Reddy)
हेही वाचा : Deva Sharif Dargah : देवा शरीफ दर्ग्यात हिंदू तरूणाला मारहाण
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी सांगितले की, मुस्लिम लोकसंख्येशी संबंधित संपूर्ण माहिती मागील वर्षी करण्यात आलेल्या जातीनिहाय जनगणनेदरम्यान संकलित करण्यात आली आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करताना संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतले जातील. तेलंगणात शांतता, बंधुता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.(Revanth Reddy)