मुंबई : (River Cleaning Campaign) केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मखमाघ महोत्सव नुकताच संपन्न झाला. या महोत्सवात साधारण २० लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतल्याची माहिती आहे. याप्रसंगी सेवाभारती आणि माता अमृतानंदमयी मिशन यांच्या समन्वयातून राबवण्यात आलेल्या सेवा उपक्रमांचे अनेक सहभागी तसेच माध्यमांच्या एका वर्गाकडून कौतुक करण्यात आले. विशेषतः नदी स्वच्छता अभियानातील (River Cleaning Campaign) ८० वर्षांवरील ज्येष्ठ स्वयंसेवकाचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.(River Cleaning Campaign)
दि. ३ फेब्रुवारी रोजी १७ दिवसांचा महोत्सव संपल्यानंतर नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले. या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरले. संघाचे ज्येष्ठ प्रचारक, ८० वर्षांवरील एस. सेतुमाधवन यांनीही मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. संघ उत्तर केरळ प्रांत प्रचारक ए. विनोद यांच्यासह ते भारथप्पुझा (नीला) नदीच्या कंबरेइतक्या पाण्यात उतरून, महोत्सवाच्या काळात साचलेला कचरा काढताना दिसून आले. प्रवचने देण्याऐवजी त्यांनी सेवा भारतीच्या गणवेशातील शेकडो स्वयंसेवकांसह प्रत्यक्ष स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. दूरस्थ देखरेख किंवा कार्यालयीन समन्वयाऐवजी संपूर्ण चमू प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करत होता.(River Cleaning Campaign)
केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले सेतुमाधवन अवघ्या १७व्या वर्षी संघाचे प्रचारक झाले. पुढे त्यांनी संघ केरळ प्रांत प्रचारक तसेच दक्षिण भारत क्षेत्राचे (केरळ, उत्तर तमिळनाडू व दक्षिण तमिळनाडू) क्षेत्रीय प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय कार्यकारी सदस्य म्हणूनही कार्य केले. केरळ आणि तमिळनाडूमध्ये ते सर्वत्र ‘सेतूएट्टन’ या नावाने ओळखले जातात. मल्याळममध्ये ‘एट्टन’ म्हणजे मोठा भाऊ. सध्या कोणतीही औपचारिक संघटनात्मक जबाबदारी नसतानाही आणि वयाची ऐशी ओलांडल्यानंतरही ते संघ व संघप्रेरित संस्थांच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रवास करत आहेत. केरळ व तमिळनाडूमधील “संघ परिवारां”मध्ये ते आजही परिचित आणि आदरणीय नाव आहेत. केरळ व तमिळनाडूमधील “संघ परिवारां”मध्ये ते आजही परिचित आहेत.(River Cleaning Campaign)
संघ कार्यकर्ते अशा उपक्रमांचा उल्लेख सेवाभावी दृष्टिकोनाचे उदाहरण म्हणून करतात. संघ शिस्त आणि स्वयंसेवकत्वासोबतच सामाजिक कार्यालाही महत्त्व देतो, असे त्यांचे म्हणणे आहे. उत्सवोत्तर स्वच्छता कार्यात सेतूएट्टन यांच्यासारख्या संघ कार्यकर्त्यांचा सहभाग केरळने पुन्हा एकदा अनुभवला. संघाने आपल्या ‘पंच परिवर्तन’ या लक्ष केंद्रित क्षेत्रांमध्ये पर्यावरणीय जबाबदारीला प्राधान्य देण्याचे आवाहन समाजाला केले आहे. नदी स्वच्छता मोहीम ही त्या दिशेने उचललेले प्रत्यक्ष पाऊल मानले जात असून, जाहीर केलेल्या तत्त्वांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणे आणि व्यापक लोकसहभागाला प्रेरित करणे हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जाते.(River Cleaning Campaign)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक