Ajit Pawar plane accident : महादेव जानकरांचा धक्कादायक दावा; “ऐनवेळी प्रवास टळला, म्हणून...”

06 Feb 2026 15:14:46
 
Ajit Pawar plane accident
 
बारामती: (Ajit Pawar plane accident) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताला एक आठवडा पूर्ण झाला आहे. या अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, दरम्यान या अपघाताबाबत नवनवीन प्रश्न आणि दावे समोर येत आहेत. (Ajit Pawar plane accident)
 
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली असतानाच, आता आणखी एका बड्या नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण त्या दिवशी अजित पवार यांच्यासोबत एकाच विमानाने प्रवास करणार होतो, असा धक्कादायक दावा केला आहे. (Ajit Pawar plane accident)
 
हेही वाचा: Maharashtra Mayor List 2026 : राज्यातील ८ महानगरपालिकांवर महायुतीचा झेंडा; तुमच्या शहराचा महापौर कोण? पहा संपूर्ण यादी
 
“ऐनवेळी उशीर झाला, म्हणून विमानात...”
 
महादेव जानकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी त्यांना २८ जानेवारी रोजी बारामतीला येण्याचे आमंत्रण दिले होते. दोघेही मुंबईहून बारामतीकडे एकत्र विमानप्रवास करणार होते. मात्र शेवटच्या क्षणी विमानतळावर पोहोचायला उशीर झाल्याने आपण त्या विमानात चढू शकलो नाही, असे जानकर यांनी सांगितले. (Ajit Pawar plane accident)
 
“मला विमानतळावर पोहोचायला उशीर झाला, म्हणून मी बारामतीचा दौरा रद्द केला. उशिरा पोहोचल्याने माझा जीव वाचला, पण राज्याने एक महान नेता गमावला…”
- महादेव जानकर
 
 
Powered By Sangraha 9.0