मुंबई : (Padmashri Manik Verma) महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका, पद्मश्री स्वर्गीय श्रीमती माणिक वर्मा (Padmashri Manik Verma) यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्त माणिक वर्मा फाउंडेशन तर्फे विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, माणिक वर्मा फाउंडेशन, कोलकात्याची नामांकित संस्था ITC – SRA संगीत रिसर्च अकादमी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील रसिकांसाठी भव्य संगीत समारोह “माणिक स्वर संगीत” आयोजित करण्यात येत आहे. शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.३० ते ११.३० आणि रविवार ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० अशा दोन सत्रांमध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे हा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.(Padmashri Manik Verma)
या सोहळ्यात कोलकाता येथील प्रतिभावान विद्यार्थी कलाकार – मौपाली चौधरी, देबोश्री भट्टाचारजी आणि श्रेया चॅटर्जी, तसेच महाराष्ट्रातील नामवंत शास्त्रीय गायक कलाकार – ओंकार दादरकर, पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे आणि पंडित उल्हास कशाळकर आपले गायन सादर करणार आहेत.याच कार्यक्रमात माणिक वर्मा फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रातील दिग्गज शास्त्रीय गायक पंडित उल्हास कशाळकर यांना “माणिक रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या सशुल्क देणगी प्रवेशिकांचे शुल्क १०० रुपये असून सभागृहावर त्या उपलब्ध आहेत. तरी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(Padmashri Manik Verma)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.