CM Devendra Fadnavis : २७ आणि २८ मार्चला मुंबईत 'पल्स' वैद्यकीय परिषद

05 Feb 2026 20:33:54
CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या 'पल्स' या वैद्यकीय परिषदेचे आयोजन येत्या २७ आणि २८ मार्च २०२६ रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.(CM Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाची आढावा बैठक पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. 'पल्स' वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून 'वेलनेस' उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करावा. पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी 'वेलनेस' उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. 'वेलनेस' उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना 'वेलनेस' कडे वळविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) यावेळी दिले.
 
हेही वाचा : Narendra Modi : थक गए, चले गए! विरोधकांच्या सभात्यागानंतर राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा प्रहार
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून परिषदेमध्ये या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चांमधून कर्करोगासारख्या आजारांवर सहज, सोपी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल. वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी, त्यांच्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या 'बल्क ड्रग पार्क' मध्ये गुंतवणूक होईल, यासाठी प्रयत्न करावे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. सबंधित विभागांनी समन्वयाने काम करीत परिषदेच्या आयोजनातून राज्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठा लाभ मिळवून द्यावा."(CM Devendra Fadnavis)
 
परिषदेचे स्वरूप कसे असेल?
 
२७ मार्च रोजी परिषदेचे उद्घाटन होईल. या परिषदेत प्लेनरी, ३६० डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी वेगळी दालने असणार आहेत. तसेच उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाची माहिती असणारी दालने असतील. परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील. जगातील नामांकित वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधकही परिषदेत सहभाग घेणार आहेत. भविष्यातील वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, उपचार पद्धतीतील संशोधन या विषयांवर पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि केस स्टडीज होणार आहेत. तसेच प्रदर्शन, राऊंड टेबल चर्चा, 'टेक टॉक' असणार आहे.(CM Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0