Rohit Pawar: 'विमानात नेमकं काय घडलं? ९ तारखेनंतर...' : रोहित पवार

05 Feb 2026 16:23:37
 
Rohit Pawar
 
मुंबई : (Rohit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या या भीषण विमान अपघातात नेमकं काय घडलं, विमानात काय परिस्थिती होती आणि अपघात कसा झाला, याबाबतची सविस्तर माहिती ९ तारखेनंतर जनतेसमोर मांडणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. (Rohit Pawar)
 
हेही वाचा : Mumbai Mayoral Election: मुंबई महापौर निवडणूक रंगणार; ठाकरे गटाकडून उमेदवार देण्याचा निर्णय...
 
रोहित पवार म्हणाले की, “विमान अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं, याबाबत आमच्यापर्यंत जी काही माहिती आली आहे, ती आम्ही तपासतो आहोत. अजूनही काही महत्त्वाची माहिती मागवली आहे. ९ तारखेनंतर या सर्व बाबींवर आम्ही स्पष्टपणे बोलणार आहोत.” (Rohit Pawar)
 
या अपघाताबाबत समाजात अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे सत्य लोकांसमोर येणं अत्यंत गरजेचं असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. “खरंच त्या दिवशी विमानात काय घडलं, हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणतीही अर्धवट माहिती न देता, संपूर्ण आणि स्पष्ट चित्र मांडू,” असंही त्यांनी नमूद केलं. (Rohit Pawar)
 
रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर ९ तारखेला नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Rohit Pawar)
 
 
Powered By Sangraha 9.0