Mumbai Mayoral Election: मुंबई महापौर निवडणूक रंगणार; ठाकरे गटाकडून उमेदवार देण्याचा निर्णय...

05 Feb 2026 15:54:44
 
Mumbai Mayoral Election
 
मुंबई : (Mumbai Mayoral Election) मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवार, ५ फेब्रुवारी रोजी मातोश्रीवर पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदाची मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. (Mumbai Mayoral Election)
 
 हेही वाचा : Madrasa Board : मदरसा बोर्ड बरखास्त करण्याच्या निर्णयावर मौलानास पोटदुखी!
 
ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता महाविकास आघाडी (मविआ) महापौर निवडणुकीत एकत्र येणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः काँग्रेस या मुद्द्यावर काय भूमिका घेते, यावर निवडणुकीचे राजकारण ठरणार आहे. (Mumbai Mayoral Election)
 
मुंबईच्या राजकारणात महापौरपदाला मोठे महत्त्व असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Mumbai Mayoral Election)
 
 
Powered By Sangraha 9.0