सावीच्या मदतीसाठी पंचकन्यांची साथ,करणार अन्यायाचा संहार

05 Feb 2026 17:03:45

मुंबई : कोल्हापूरच्या कोर्टात एक मोठा खटला सध्या सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या खटल्याकडे लक्ष आहे. महाराष्ट्रात अश्या बऱ्याच केस घडत असतात जिथे खोट्या आरोपांमुळे अन्याय सहन करावा लागतो, आणि बरेचदा निर्दोष व्यक्तींच आयुष्य पणाला लागत. 'सन मराठी' वरील 'जुळली गाठ गं' या मालिकेत सावी अशाच कठीण प्रसंगाचा  सामना करत आहे. कोल्हापूर मध्ये सर्वत्र  #Justiceforsavi असे बॅनर झळकताना दिसत आहेत. मालिकेत काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद हा व्यक्ती आला. भाऊंचा विद्यार्थी असल्याचा बनाव करत स्वतःच्या बिझनेस साठी त्याने सावीकडे मदत मागितली. मदतीसाठी होकार देऊन सावी नकळत सावी या प्रकरणात अडकते. सावी वर अंगदला आत्महत्या साठी प्रवृत्त करण्याचा आणि अंगदचा विनयभंग केल्याचा आरोप लावून अटक करण्यात येते. 'जुळली गाठ गं'मालिकेला अल्पावधितच प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.






View this post on Instagram
















A post shared by Sun Marathi (@sunmarathi)



खरतर सावीला धैर्यच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी दामिनीनेच सावीविरोधात हा कट रचला आहे. धैर्यचा सावीवर विश्वास आहे. पण त्याच्या आजारपणाचा फायदा घेत दामिनी व घरातील इतर सदस्य त्याला सावीपासून लांब ठेवत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार ? धैर्य ची साथ नसताना सावी या अन्यायाविरोधात कशी उभी राहील? सावी निर्दोष सुटू शकेल का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण या प्रकरणात सावीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी पंचकन्यांची साथ तिला मिळणार आहे.






View this post on Instagram
















A post shared by Sun Marathi (@sunmarathi)



इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या मदतीसाठी धावून आली आहे. कायद्याच्या कचाट्यातून सोडवायला राणी देखील सावी सोबत उभी आहे. पण आता अर्पिता, अनुप्रिया, आणि वैदही यांचीही साथ सावीला मिळणार आहे. राणी मनू, अर्पिता, अनुप्रिया, वैदेही या पंचकन्या सावीला कसं निर्दोष सिद्ध करतील? आणि हे करताना त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे. पंचकन्यांचा प्रहार करणार आहे अन्यायाचा संहार. 'जुळली गाठ गं' ही मालिका रात्री ८ वाजता सन मराठी वाहिनीवर प्रसारित होते.
Powered By Sangraha 9.0