मुंबई : (Dhurandhar 2) रणवीर सिंगचा ब्लॉकबस्टर ठरलेला 'धुरंदर' भाग २चा टिझर नुकताच ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. क्षणार्धातच तो टिझर सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान या टिझरनंतर सोशल मिडियावर एक अजबच किस्सा व्हायरल होतो आहे. या सिनेमात एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून राहुल गांधी यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर यासंबंधित मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी या पोस्ट खाली आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
'Dhurandar' सिनेमात एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काँग्रेसनेते राहुल गांधी नसुन, एक सिनीयर फिल्म प्रोड्यूसर राहुल गांधी आहेत. त्यांनी आतापर्यंत लकी भास्कर, वेदा, फर्जी, राँकेट बाँयज, रुस्तमसारख्या अनेक हिट प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.
हेही वाचा : Ananya Pandey: अभिनेत्री अनन्या पांडे ने घेतले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन; म्हणाली,....
धुरंदरचा पहिल्या भाग बाँक्स आँफिसवर हिट झाला. त्यांने भारतात ८३६.९५ कोटीची कमाई केली. आता 'धुरंधर २' बाँक्स आँफिसवर ब्लॉकबस्टर ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.