Bangladeshi Hindu: बांगलादेशी हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात अमेरिकेत राष्ट्रव्यापी जनजागृती आंदोलन

05 Feb 2026 13:12:49
Bangladeshi Hindu 
 
मुंबई : (Bangladeshi Hindu) बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात अमेरिकेत सातत्याने आंदोलन होत आहेत. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील २२ शहरांमध्ये शांततामय जनजागृती रॅलींचे आयोजन करण्यात आले. कडाक्याची थंडी, हिमवृष्टी आणि गोठलेल्या रस्त्यांनाही न जुमानता या रॅलींमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. त्यांनी बांगलादेशातील धार्मिक आधारावर लक्ष्य केलेल्या हिंसाचारातील पीडितांप्रती एकजूट व्यक्त केली. शहर सभागृह आणि सिव्हिक सेंटर्ससमोर एकत्र येत आंदोलकांनी आपले आंदोलन राजकीय नसून मानवीय असल्याचे स्पष्ट केले. (Bangladeshi Hindu)
 
मिळालेल्या माहितीनुसार, मिडवेस्टपासून पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांपर्यंत आंदोलकांनी लिंचिंग, जाळपोळ, लैंगिक हिंसाचार आणि लक्ष्यित हत्यांच्या नोंदवलेल्या घटनांविरोधात निषेध व्यक्त करत जनजागृती केली. या राष्ट्रव्यापी अभियानाचे समन्वय दैपायन देब, दीप्ती महाजन, गीता सिकंद आणि दिव्या जैन यांनी केले. त्यांनी सांगितले की हे आयोजन राजकारणातून नव्हे, तर करुणेतून प्रेरित होते. हा मानवी प्रतिष्ठेसाठी उभे राहण्याचा विषय होता, राजकारणाचा नव्हे. जेव्हा निरपराध लोकांना लक्ष्य केले जाते, तेव्हा करुणा ही भीती किंवा गैरसोयीपेक्षा मोठी असली पाहिजे. (Bangladeshi Hindu)
 
हेही वाचा:  चूक आपलीही आहे...
 
गीता सिकंद यांनी सांगितले की या रॅलींमधून समुदाय आणि धर्मांमधील एकतेचे दर्शन घडले. या रॅलींमध्ये बांगलादेशी हिंदू अमेरिकन नागरिकांनीही सहभाग घेतला होता. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या अस्तित्वाबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच, हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी पावले न उचलल्यामुळे बांगलादेश सरकारची उदासीनता चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Bangladeshi Hindu)
 
 
अनेक शहरांतील या आंदोलनांमध्ये स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि नागरी नेतेही सहभागी झाले होते. आयोजकांच्या मते, यामुळे शांततामय नागरी अभिव्यक्ती आणि समुदाय-नेतृत्वाखालील उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, जागतिक मानवाधिकार विषयांना उजागर करण्यास ते उपयुक्त ठरत आहेत. (Bangladeshi Hindu)
 
 
Powered By Sangraha 9.0