मुंबई : (Kanchan Bai Meghwal) मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यात एका अंगणवाडीतील स्वयंपाकी महिलेने २० चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कंचन बाई मेघवाल (Kanchan Bai Meghwal) असे त्यांचे नाव असून त्या जिल्ह्यातील माधवाडा पंचायतअंतर्गत रानपूर गावातील अंगणवाडी केंद्रात कार्यरत होत्या. मुलं खेळत असताना मधमाश्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कंचन बाईंनी मुलांचे प्राण वाचवले.(Kanchan Bai Meghwal)
मिळालेल्या माहितीनुसार, मधमाश्यांनी हल्ला केल्यानंतर कंचन बाई (Kanchan Bai Meghwal) तात्काळ मुलांच्या मदतीला धावल्या. त्यांनी ताडपत्री आणि चटईचा वापर करून मुलांना त्यात गुंडाळले आणि अंगणवाडीच्या आत सुरक्षित ठिकाणी नेले. मुलांना वाचवत असतानाच मधमाश्यांनी कंचन बाई मेघवाल (Kanchan Bai Meghwal) यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना शेकडो डंख मारले.
हेही वाचा : Madrasa Board : मदरसा बोर्ड बरखास्त करण्याच्या निर्णयावर मौलानास पोटदुखी!
या हल्ल्यात कंचन बाई (Kanchan Bai Meghwal) अंगणवाडी केंद्रातच बेशुद्ध होऊन कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर त्यांना सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाश्यांच्या असंख्य डंखांच्या खुणा होत्या, ज्यातून मुलांचे प्राण वाचवताना त्यांनी दाखवलेले शौर्य स्पष्टपणे दिसून येते.(Kanchan Bai Meghwal)
कंचन बाई मेघवाल (Kanchan Bai Meghwal) या रानपूर गावासाठी केवळ एक अंगणवाडी कर्मचाऱ्याच नव्हत्या, तर त्याहूनही अधिक होत्या. त्या मुलांसाठी दुपारचे जेवणही तयार करत असत. त्या ‘जय माता दी’ स्वयं-सहायता गटाच्या अध्यक्षही होत्या. कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती त्या होत्या. त्यांचे पती शिवलाल हे पक्षाघातग्रस्त असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मंगळवारी शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव गावात पोहोचताच संपूर्ण गाव अश्रूंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत होते. मधमाश्यांचे पोळे तात्काळ हटवावेत आणि कंचन बाई मेघवाल यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(Kanchan Bai Meghwal)