Bhavna Bohra : छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात मोठी घरवापसी

05 Feb 2026 17:42:12
Bhavna Bohra

मुंबई : (Bhavna Bohra) छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात घरवापसीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये ६५ आदिवासी महिला-पुरुषांनी सनातन धर्मात पुनर्प्रवेश केला. हा कार्यक्रम पंडरिया विधानसभा क्षेत्रातील वनवासी गाव दमगड येथे पंडरिया मतदारसंघाच्या आमदार भावना बोहरा (Bhavna Bohra) यांच्या पुढाकाराने पार पडला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण २६५ जणांची घरवापसी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आयोजकांच्या मते, ही घरवापसी पूर्णतः स्वेच्छेने झाली असून आपल्या मूळ धर्मात परतणाऱ्या कुटुंबांना सन्मान आणि सामाजिक स्वीकार्यता मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.(Bhavna Bohra)
 
आयोजकांनी स्पष्ट केले की, घरवापसी ही पूर्णपणे ऐच्छिक असून आपल्या मूळ धर्मात परतणाऱ्या कुटुंबांना सन्मान आणि समाजात प्रतिष्ठा मिळावी, हा यामागील मुख्य हेतू आहे. घरवापसी करणाऱ्या आदिवासी कुटुंबांचे पारंपरिक रितीरिवाज आणि विधी-विधानांसह स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार भावना बोहरा यांनी स्वतः लोकांचे पाय धुऊन त्यांचा सन्मान केला, तसेच घरवापसी करणाऱ्यांना भेटवस्तूही प्रदान केल्या.(Bhavna Bohra)
 
हेही वाचा : Madrasa Board : मदरसा बोर्ड बरखास्त करण्याच्या निर्णयावर मौलानास पोटदुखी!  
 
घरवापसी करणाऱ्या नागरिकांनी यापूर्वी धर्मांतर करण्यामागील कारणेही सांगितली. आजारपण, आर्थिक अडचणी आणि कठीण परिस्थितीमुळे त्यांनी पूर्वी दुसरा धर्म स्वीकारला होता, असे त्यांनी नमूद केले. मात्र योग्य माहिती मिळाल्यानंतर आणि स्थानिक पातळीवरील प्रयत्नांमुळे ते पुन्हा आपल्या मूळ सनातन धर्मात परतले. या पुनर्प्रवेशामुळे त्यांना मानसिक शांती आणि समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांनी आदिवासी भागांमध्ये सुरू असलेल्या मिशनरी हालचालींबाबत आरोप केले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या कमतरतेचा फायदा घेऊन दीर्घकाळापासून धर्मांतराचे काम सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आजार बरे करण्याचे आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून लोकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.(Bhavna Bohra)
 
भावना बोहरा कोण आहेत?
 
भावना बोहरा (Bhavna Bohra) या कबीरधाम जिल्ह्यातील पंडरिया विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. आदिवासीबहुल भागांमध्ये धर्मांतर झालेल्या लोकांची घरवापसी घडवून आणण्याच्या मोहिमेत त्या सक्रिय आहेत. भावना बोहरा या एक शाळा चालवतात आणि एका सामाजिक संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवतात. आमदार होण्यापूर्वी त्या कबीरधाम जिल्हा परिषदेच्या सभापती होत्या. त्यांचा जन्म कवर्धा जिल्ह्यातील रणवीर गावात झाला. त्यांचे पती मनीष बोहरा हे व्यावसायिक आहेत. त्या कबीरधाम जिल्ह्यात मोफत रुग्णवाहिका सेवेचेही संचालन करतात.(Bhavna Bohra)
 
 
Powered By Sangraha 9.0