मुंबई : (Manipur New CM Yumnam Khemchand Singh) ईशान्य भारतातील मणिपूर राज्याला गेल्या दोन वर्षांपासून राजकीय अस्थिरतेसह जातीय हिंसाचाराचा सामना करावा लागत होता. संघर्ष आणि हिंसाचारामुळे होरपळत असलेल्या मणिपूर राज्याला नवीन नेतृत्व मिळाले आहे. भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरच्या भाजप आमदारांनी गटनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीसोबतच ते आता मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.(Manipur New CM Yumnam Khemchand Singh)
भाजपच्या मणिपूर आमदारांच्या बैठकीत युमनाम खेमचंद सिंह यांचा गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत खेमचंद सिंह यांच्या नावावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले. याच बैठकीत त्यांच्या नेतृत्वाची औपचारिक घोषणा करण्यात आली आणि त्यांना लवकरच मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे ठरले आहे. ही निवड राज्यातील राजकीय अनिश्चिततेवर पडदा फाडणारी आणि नागरिकांसाठी आशेची किरण ठरणारी आहे.(Manipur New CM Yumnam Khemchand Singh)
मणिपूरमधील सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत भाजपने खेमचंद सिंह यांच्या रूपाने एका अनुभवी नेत्याला संधी दिली आहे. युमनाम खेमचंद सिंह यांनी यापूर्वी मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्याकडे प्रशासकीय आणि राजकीय दांडगा अनुभव आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली, विधानसभेत सुत्रबद्ध चर्चा आणि निर्णय प्रक्रियेत सुधारणा झाल्याचे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारणे आणि शांतता प्रस्थापित करणे हे त्यांच्यासमोरील पहिले आणि सर्वात मोठे आव्हान असणार आहे.(Manipur New CM Yumnam Khemchand Singh)