Suresh Soni: पूजा पद्धती, भाषा व पंथ विविध असूनही...

    04-Feb-2026   
Total Views |
 
Suresh Soni
 
मुंबई : (Suresh Soni) ज्याप्रकारे शंकराचार्यांसारख्या महान संतांनी सर्व जीव-जंतु, पशु-पक्ष्यांमध्ये एकच परमेश्वर पाहिला, त्याचप्रमाणे भारतातील गावात राहणारा सामान्य नागरिकही देव एकच असून त्याची रूपे अनेक आहेत, हे समजतो. विविध पूजा पद्धती, अनेक भाषा आणि अनेक पंथ असतानाही भारतीय समाज एकसंध आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश सोनी यांनी केले. (Suresh Soni)
 
भोपाळच्या भेल दशहरा मैदानात आयोजित तीन दिवसीय मातृभाषा सोहळ्याच्या अंतिम दिवशी समारोप सत्रात ते बोलत होते. यावेळी दशहरा मैदानात सांस्कृतिक विविधतेचे भव्य दर्शन घडले. (Suresh Soni)
 
मातृभाषा मंचाविषयी बोलताना सुरेश सोनी म्हणाले. मातृभाषा मंच मागील आठ वर्षांपासून समाजजागरण हे ध्येय ठेवून कार्य करत आहे. हा विषय समजून घेण्यासाठी भाषणाची आवश्यकता नसून तो अनुभवाचा विषय आहे, जो येथे उभारलेल्या प्रदर्शनांच्या माध्यमातून जाणवू शकतो. यामागील मूलभूत संदेश असा आहे की भारत एक आहे आणि भारतीय समाज एक आहे. (Suresh Soni)
 
हेही वाचा :  कह रैदास... भेद न कोई!
 
सकाळच्या सत्रात भगवान झूलेलाल यांच्या जीवनावर आधारित अत्यंत सुंदर आणि भक्तिभावपूर्ण नृत्यनाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. या नृत्यनाटिकेत १६ कलाकारांनी सहभाग घेतला. नाटिकेच्या माध्यमातून भगवान झूलेलाल यांच्या जीवनसंघर्ष आणि उपदेशांवर प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा यांच्या यशस्वी जीवनावर प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण नाटक सादर करण्यात आले. दिग्दर्शक विवेक त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ कलाकारांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनसंघर्षाचे प्रभावी सादरीकरण केले. (Suresh Soni)
 
राम जन्मभूमीशी संबंधित संघर्ष, आव्हाने आणि मंदिरनिर्मितीची विजयगाथा चलचित्राच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली. मातृभाषा मंचाचे संयोजक अमिताभ सक्सेना यांनी सांगितले की, हा उपक्रम २०१८ पासून आयोजित केला जात आहे. समारोप सत्रात संघाच्या शताब्दी वर्षावर आधारित ‘राष्ट्र सर्वोपरि’ या विषयावर मोहित सेवानी आणि त्यांच्या समूहाने भव्य सादरीकरण केले. (Suresh Soni)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक