Praful Patel : काय राज ठाकरे वाकरे; प्रफुल्ल पटेल यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

04 Feb 2026 18:45:15
Praful Patel
 
मुंबई: (Praful Patel) राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आला. अफवाही पसरल्या गेल्या की प्रफुल पटेल पक्षाचे पुढील अध्यक्ष होणार आहेत, मात्र पटेल यांनी स्पष्ट केले की, ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. त्यांनी सांगितले की, आमच्यापुढे सध्या विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी सोडून अन्य कोणताही व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष होईल. सोबतच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष पटेल नसावा, तर पाटील असावा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं होतं. आता त्यावरून खासदार प्रफुल पटेल यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात मंगळवारी दिनांक ०४ फेब्रुवारीला दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी प्रफल पटेल म्हणाले की, आम्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो. पार्थ आणि जय पवार यांच्यासमोर आम्ही त्यांना धीर दिला. राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे तुमच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. अजितदादांच्या पश्चात तुम्ही पक्षाची जबाबदारी स्वीकारावी, ही जनतेची तसेच पक्षाच्या सर्व नेत्यांची भावना आहे. त्यावर सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या विनंतीला मान दिला.
 
तीन दिवसांचा दुखवटा पाळल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला. यावेळी पटेल म्हणाले की, पक्षाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना एका केंद्रीय मंत्र्याने चुकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केला. मी सध्या पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. त्यामुळे विधिमंडळ किंवा राष्ट्रीय अध्यक्षाचा विषय मार्गी लावण्याची प्रक्रिया माझ्यावर आहे, तर महाराष्ट्रातील जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर आहे.
 
पटेल यांनी स्पष्ट केले की पक्षाच्या अध्यक्षपदाचा निर्णय योग्य पद्धतीने होईल आणि योग्य व्यक्तीचीच निवड केली जाईल. त्यांनी सांगितले, याप्रकरणी उगीच संशय निर्माण करणे ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. मला याविषयी अजिबात बोलायचे नाही.
 
प्रफुल पटेल यांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना पटेल म्हणाले, राज ठाकरे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का? माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता कोण आणि अध्यक्ष कोण होईल, हे आम्ही ठरवू. राज ठाकरे किंवा सकाळी ९ वाजताच्या भोंग्याने आम्ही काय करावे, हे सांगू नये. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत.
 
राज ठाकरे यांची पोस्ट काय होती?
 
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही







View this post on Instagram
















A post shared by MahaMTB (@themahamtb)


एकंदरीत, प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपली भूमिका स्पष्ट करत अफवा फेटाळल्या आणि पक्षाच्या नेतृत्व प्रक्रियेत योग्य पद्धतीने निर्णय होईल, असे ठामपणे सांगितले.
Powered By Sangraha 9.0