Mumbai-Pune Expressway : मुंबईकर-पुणेकर कोंडींत! अत्यावश्यक सेवाही ठप्प! १५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, महिला-बालकांचे हाल!

Total Views |
Mumbai-Pune Expressway
 
मुंबई : (Mumbai-Pune Expressway) मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Expressway) महामार्गावर गॅस टँकर उलटला आणि मोठी गॅस गळती झाली. या दुर्घटनेमुळे मंगळवार, दि.३ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून हा महामार्ग (Mumbai-Pune Expressway) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. तब्बल २४ तास वाहतुकीसाठी बंद असलेल्या महामार्गावरून अखेर बुधवार,दि.४ रोजी दुपारी तीन पासून अंशत: वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र २४ तास उलटूनही महामार्गावर वाहतूक संथगतीनेच सुरू होती. मात्र वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालक-प्रवाशांना दिलासा मिळाला.(Mumbai-Pune Expressway)
 
दरम्यान, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) बोरघाटात बोगद्यानजीक मंगळवार,दि३ रोजी सायंकाळी ५ वाजता गॅस टँकरचा अपघात झाला. गॅस टँकर उलटला आणि ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची मोठी गळती सुरु झाली. त्यानंतर तातडीने महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने वळविण्यात आली. द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मोठ्या संख्येने जुन्या महामार्गाने वळविल्याने खोपोलीपासून पुढे २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. परिणामी, बुधवार,दि.४ रोजी वाहनाचालक-प्रवासी, रुग्ण, विमानतळावर पोहचण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.(Mumbai-Pune Expressway)
 
मंगळवार,दि.५ वाजल्यापासून बुधवार,दि.५ रोजी संध्याकाळपर्यंत महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. बुधवारी संध्याकाळी गॅस गळती रोखण्यात तज्ज्ञांच्या पथकाला यश आले. यांनतर महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या सूचनेनुसार, वाहतूक सुरक्षितपणे सुरळीत करण्यासाठी आणि वाहनांची कोंडी टाळण्यासाठी सायंकाळी ७.३० वाजता पुणे कॉरिडॉरवरील एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. पुण्याकडे जाणारी वाहतूक उर्वरित दोन लेनमधून सुरु ठेवण्यात आली. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेच्या मॅजिक पॉइंट येथून खोपोली (जुना महामार्ग)मार्गे वळविण्यात आली.(Mumbai-Pune Expressway)
 
हेही वाचा : Mumbai lift accident : मुंबईत लिफ्टमध्ये भयानक स्फोट: तरुणी आरशात पाहत होती अन् डोळ्याची पापणी लागण्या आधीच झाला स्फोट!  
 
महिलांचे आणि बालकांचे हाल
 
वाहतूक कोंडीदरम्यान तब्बल १० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाट विभागात ही वाहतूक कोंडी झाल्याने आणि महामार्गावर स्वच्छतागृहाच्या सुविधाच नसल्याने महिलांचे हाल झाले. याचसोबत लहान मुलांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. जवळ फूड मॉल किंवा अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.(Mumbai-Pune Expressway)
 
प्रवाशांच्या तक्रारीनंतर टोल प्लाझा बंद
 
एमएसआरडीसीकडून एफएम रेडिओ, सोशल मीडिया आदी विविध माध्यमांच्या माध्यमातून एक्सप्रेस वे वरील वाहतूक परिस्थितीबाबत प्रवाशांना माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे व पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना आयआरबीमार्फत जिथे शक्य होते तिथे पाण्याच्या बाटल्या व खाद्यपदार्थांचे पॅकेट वितरित करण्यात आले. टोल प्लाझावरून वाहनांना विनामूल्य प्रवेश व निर्गमनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.(Mumbai-Pune Expressway)
 
एसटी महामंडळाच्या १६३ एसटी बसेस अडकल्या
 
या घटनेचा परिणाम एसटी महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ३७ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. तर एसटी महामंडळाच्या १६३ एसटी बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे.(Mumbai-Pune Expressway)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.