मुंबई: (MS Dhoni) भारतीय क्रिकेट संघ ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप २०२६ साठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया या स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून मैदानात उतरणार असून, २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक कामगिरी करत विजेतेपद पटकावलं होतं. यंदा हे विजेतेपद कायम राखण्याची जबाबदारी कर्णधार सूर्यकुमार यादववर आहे. अशा पार्श्वभूमीवर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने संघाचं आणि विशेषतः अनुभवी खेळाडूंचं मनापासून कौतुक केलं आहे. (MS Dhoni)
गेल्या काही काळापासून क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली वाढत्या वयामुळे २०२७ चा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळू शकतील का? मात्र ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकांमध्ये दोघांनीही शानदार फलंदाजी करत आपण अजूनही सर्वोच्च फॉर्ममध्ये असल्याचं सिद्ध केलं. (MS Dhoni)
या सगळ्या चर्चांवर आता एमएस धोनीने ठाम भूमिका घेतली आहे. एका कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धोनी म्हणाला, “रोहित आणि विराट यांनी का खेळू नये? वय हा निवडीचा निकष नसतो. परफॉर्मन्स आणि फिटनेस हेच खरे मोजमाप असतात. जर खेळाडू तंदुरुस्त असेल आणि सातत्याने चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला संधी नाकारण्याचं कोणतंही कारण नाही.” (MS Dhoni)
अनुभवाचं महत्त्व अधोरेखित करताना धोनीने सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं. “आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेगळं असतं. तिथं अनुभव फार महत्त्वाचा असतो. कमीत कमी ८० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला खेळाडूच त्या दबावाला योग्यरीत्या सामोरा जाऊ शकतो,” असंही धोनी म्हणाला. (MS Dhoni)