मुंबई : (Maithili Thakur) भाजप आमदार आणि प्रसिध्द गायिका मैथिली ठाकुर हिने नुकतेच चिमूर येथील श्री हरिबालाजी मंदिराचे दर्शन घेतले. तिने सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात तीने संत एकनाथ महाराजांचे 'माझे माहेर पंढरी' हा अभंग गाऊन उपस्थितांना अगदी मंत्रमुग्ध केले होते.
तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, चार-साडेचार वर्षांपूर्वी उभारलेले चिमूर येथील श्री हरिबालाजी मंदिर—जिथे भगवान विष्णूच्या दिव्य मूर्तीमध्ये गंगा-यमुनेचा पवित्र संगम अनुभवायला मिळतो. तसेच राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांच्या कार्यभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. दरम्यान या पोस्टखाली चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : 'पुन्हा बिगबॉस नको...' सोनाली राऊत बिगबॉस मराठी ६ मधून बाहेर पडल्यानंतर पाहा काय म्हणाली...
मैथिली ठाकूर ही मूळची बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील असून तिला भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचे उत्तम ज्ञान आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत तिने राजदचे उमेदवार बिनोद मिश्रा यांचा पराभव करत बिहारमधील सर्वात तरुण आमदार झाली आहे.