Swami Govinddev Giri Maharaj : 'साहित्य' समाज आणि राष्ट्राला दिशा देणारे प्रभावी माध्यम!

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे प्रतिपादन

    04-Feb-2026   
Total Views |
Swami Govinddev Giri Maharaj
 
मुंबई : (Swami Govinddev Giri Maharaj) भाऊराव देवरस सेवा न्यास, लखनौ यांच्या वतीने ३१ वा पंडित प्रताप नारायण मिश्र स्मृती युवा साहित्यकार पुरस्कार सोहळा सरस्वती शिशु मंदिर, निरालानगर, लखनौ येथील माधव सभागृहात नुकताच संपन्न झाला. साहित्यकार पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, साहित्य हे केवळ शब्दांचे संयोजन नसून समाज आणि राष्ट्राला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. श्रेष्ठ साहित्य शतकानुशतके जिवंत राहते आणि राष्ट्रचेतना जागृत करते.(Swami Govinddev Giri Maharaj)
 
ते (Swami Govinddev Giri Maharaj) म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी राष्ट्रासाठी अमूल्य कार्य केले. भाऊराव देवरस यांचे नाव आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. भक्ति, समर्पण, राष्ट्रनिष्ठा आणि ध्येयनिष्ठा म्हणजे काय, हे संघ प्रचारकांच्या मंगलमय परंपरेतून संपूर्ण जगाला दिसून येते. अशा या परंपरेला मी नमन करतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये साहित्याची अपार महिमा गायिली गेली आहे. साहित्याच्या बळावरच आपली संस्कृती टिकून राहिली. मुघल आक्रमकांनी भारतीय साहित्य जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरीही वैदिक व भारतीय संस्कृती टिकून राहिली. त्यामुळेच आज भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा काळ आपण अनुभवत आहोत. येत्या काळात भारतमाता जगाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेली आपण पाहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Swami Govinddev Giri Maharaj)
 
हेही वाचा : अभिनेत्री अनन्या पांडे ने घेतले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन; म्हणाली,....  
 
पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे कौतुक करत स्वामीजी पुढे म्हणाले, साहित्यकारांचा सन्मान म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतीची पूजा होय. जगातील सर्व क्षेत्रांमध्ये साहित्याचे स्थान सर्वोच्च आहे. कारण साहित्याचा प्रभाव चिरस्थायी असतो. बोललेला शब्द तात्कालिक परिणाम करतो, तर लिहिलेला शब्द दीर्घकालीन प्रभाव टाकतो. लोकहित साधणारे, सद्भावना व प्रेरणा जागवणारे, राष्ट्रभक्तीपर व लोकमंगलकारी साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे.(Swami Govinddev Giri Maharaj)
 
महर्षी वेदव्यास, वाल्मीकि आणि कालिदास यांसारख्या महान साहित्यिकांची उदाहरणे देत गोविंददेव गिरी महाराजांनी स्पष्ट केले की, लोकमंगलासाठी लिहिलेले साहित्यच सर्वोच्च ठरते. आजचे साहित्य असे असावे की, जे लोकांमध्ये ऊर्जा, सेवा आणि समर्पणाची भावना निर्माण करेल. त्यांच्या मते, राष्ट्राला एका सूत्रात बांधणारे साहित्य हेच खऱ्या राष्ट्रोन्नतीचा भक्कम पाया ठरते.(Swami Govinddev Giri Maharaj)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक