Kala Ghoda Arts Festival: काला घोडा कला महोत्सवातील चर्चासत्रावर प्रश्नचिन्ह?

04 Feb 2026 12:53:56



 
Kala Ghoda Arts Festival

मुंबई : (Kala Ghoda Arts Festival) काला घोडा कला महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या “इन्कार्सरेटेड : टेल्स फ्रॉम बिहाइंड बार्स” या चर्चासत्रावर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चर्चासत्रात आनंद तेलतुंबडे यांचा सहभाग असल्याने कार्यक्रमाच्या स्वरूपावर आणि त्यास दिलेल्या मान्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. (Kala Ghoda Arts Festival)
 
आनंद तेलतुंबडे यांना यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासारख्या गंभीर आरोपांखाली बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत अटक केली होती. सध्या ते जामिनावर मुक्त असून, अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या प्रायोजकत्वाखाली होणाऱ्या काला घोडा कला महोत्सवात “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यासाठी सरकार प्रायोजित तुरुंगवास” या विषयावर व्याख्यान आयोजित होणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Kala Ghoda)

सरकार प्रायोजित सांस्कृतिक महोत्सवात अशा स्वरूपाच्या गंभीर प्रकरणांशी संबंधित व्यक्तींना व्यासपीठ देणे कितपत सुसंगत आहे, तसेच या माध्यमातून समाजात कोणता संदेश जाणार आहे, याबाबतही विचार मांडला जात आहे. विशेषतः कला व संस्कृतीच्या नावाखाली होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये निवड प्रक्रिया आणि विषयांची संवेदनशीलता तपासली जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. (Kala Ghoda Arts Festival)
हेही वाचा : कुतूहलातून छंदाकडे... 


 
या पार्श्वभूमीवर काला घोडा कला महोत्सवाच्या प्रायोजकत्वाबाबत महाराष्ट्र सरकारने फेरविचार करावा, तसेच संबंधित कार्यक्रमास मान्यता देण्यामागील प्रक्रिया व निर्णयांबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे. (Kala Ghoda Arts Festival)
 
सदर आनंद तेलतुंबडे याला महाराष्ट्र पोलिसांनी देशा विरुद्ध युद्ध पुकारण्यासारख्या गंभीर आरोपाखाली यूएपीए कलमा अंतर्गत अटक केलेली आहे. सध्या तो जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सरकार यांचे प्रायोजकत्व असलेल्या काला घोडा कला महोत्सवात देशद्रोहाच्या गुन्ह्यातील आरोपी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यासाठी सरकार प्रायोजित तुरुंगवास' यावर व्याख्यान देणार आहेत. महाराष्ट्र सरकारने काला घोडा कला महोत्सवाच्या प्रायोजकत्वावर पुन्हा विचार करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी. (Kala Ghoda Arts Festival)
- तुषार दामगुडे
 

 

Powered By Sangraha 9.0