Mumbai Bullet Train Project : ठाकरे सरकारमुळे महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर; केंद्रीय मंत्र्यांचं विधान

04 Feb 2026 13:15:10
५०
Bullet Train

मुंबई : (Mumbai Bullet Train Project)
बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून, सर्व ठिकाणची स्टेशन अत्याधुनिक आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी परवानगी दिली नाही. कामे रोखून ठेवली. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर झाला आहे. सरकार बदलल्यावर आवश्यक परवानग्या देण्यात आल्या. प्रकल्पाला गती मिळाली. २०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम ठाण्यापर्यंत पूर्ण होईल आणि २०२९ पर्यंत पूर्ण मुंबईपर्यंत बुलेट ट्रेन धावू शकणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. (Mumbai Bullet Train Project)

दरम्यान, ईस्ट-वेस्ट जे कॉरिडोर आपण करत आहोत, तो देशाला ईस्ट-वेस्ट जोडणार आहे. महाराष्ट्रातील वाढवण बंदरापर्यंत याची मार्गिका असणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांना देखील जोडण्याचं काम करण्यात येणार आहे. गुजरातचे देखील रेल्वे बजेट सर्वात जास्त आहे. त्यामुळे ईस्ट वेस्ट कॉरिडोर बनत आहे”, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. (Mumbai Bullet Train Project)

“पश्चिम बंगालचे सरकार विरोधी सरकार आहे. त्यामुळे जे मोठे काही प्रकल्प असेल तर त्याला ते विरोध करतात. कोलकाता मेट्रोला देखील त्यांनी विरोध केला. गेल्या ४० वर्षांमध्ये २५ किलोमीटरचा काम झालेले होते. गेल्या ११ वर्षात ४५ किलोमीटरचे काम झालेले आहे. परंतु राज्य सरकारची मदत न मिळाल्यामुळे परवानगी मिळत नाही आहे. मेट्रो प्रकल्प झाले असते तर त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना मोठी मदत झाली असती. पण ते करून देत नाहीत. परंतु हे काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. २०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम ठाण्यापर्यंत पूर्ण होईल आणि २०२९ पर्यंत पूर्ण मुंबईपर्यंत बुलेट ट्रेन धावू शकणार आहे” असा अश्विनी वैष्णव यांनी दावा केला. (Mumbai Bullet Train Project)


Powered By Sangraha 9.0