मुंबई : ( Ananya Panday ) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. नुकतेच अनन्याने नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. अनन्याने याबाबत सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत आपला अनुभव व्यक्त केला. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, “हर हर महादेव… हे माझं पहिलंच ज्योतिर्लिंग दर्शन आहे. एका सुंदर आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झाली आहे.”
त्र्यंबकेश्वर मंदिरात तिने विधीवत पूजा केली असून भगवान महादेवाचे आशीर्वादही घेतले. याआधीही अनन्याने महादेवांच्या एका मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती मंदिरात दिवस घालवताना, प्रार्थना करताना आणि गायींना चारा घालताना दिसत होती.
दरम्यान, अनन्याची ही आध्यात्मिक बाजू चाहत्यांना भावली असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
<!-- Inject Script Filtered -->