Lata Guthe : लता गुठे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

03 Feb 2026 13:16:06
Lata Guthe
 
मुंबई : (Lata Guthe) लता गुठे यांच्या 'काहूरवाट' काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेचवांद्र्याच्या नॅशनल लायब्ररी येथे विश्वभरारी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनामध्ये आशिषजी शेलार (मंत्री भाषा तंत्रज्ञान संस्कृती ) सुप्रसिद्ध कवी किरण येले व संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांच्या हस्ते पार पडले.(Lata Guthe)
 
हेही वाचा : मराठी भाषा संवाहक सरोजिनी 
 
यावेळी रेखा नार्वेकर लिखित स्तुतीसुमनांचे झेले (लेखसंग्रह) व विद्या काळे लिखित 'मर्मबंध' (कादंबरी) या भरारी प्रकाशाच्या आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार पराग अळवणी लेखक अभिनेते प्रकाश राणे, नॅशनल लायब्ररीचे सचिव प्रमोद महाडिक उपस्थित होते. काहूरवाटा हे लता गुठे (Lata Guthe) यांचे २५वे पुस्तक व भरारी प्रकाशनचे ३२५ वे पुस्तक असल्यामुळे या शानदार सोहळ्याला अनेक क्षेत्रातील मान्यवर, कवी, लेखक मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते. यामध्ये कवी अरुण म्हात्रे, डॉक्टर सुनील रामटेके प्रतिभा सराफ, एकनाथ आव्हाड, कवी अजय कांडर, वृषाली विनायक, संजय भिडे, संपादिका सोनल खानोलकर, विद्या प्रभू व इतर कवी लेखकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले.(Lata Guthe)
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0