CM Devendra Fadnavis : भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

03 Feb 2026 16:03:14
CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आपल्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हणाले की, "भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल."(CM Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Sunetra Pawar: मोठी बातमी! पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच 
 
महाराष्ट्रातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले
 
"महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0