मुंबई : (India-US Trade Deal) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात रविवारी फोनवर झालेल्या चर्चेनंतर, अमेरिकेने भारतासोबत अनेक महिन्यांपासून रखडलेला व्यापार करार झाला असल्याची घोषणा केली आहे. या करारानुसार, भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर आकारला जाणारा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेच्या द्विपक्षीय संबंधांने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.(India-US Trade Deal)
ट्रम्प यांनी काय म्हटले?
या निर्णयाची माहिती ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "तात्काळ प्रभावाने, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शविली आहे, ज्यानुसार अमेरिका भारतीय वस्तूंवरील 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल. त्या बदल्यात भारत देखील अमेरिकी उत्पादनांवरील त्यांचे शुल्क आणि विना-शुल्क अडथळे 'शून्य' करण्यासाठी पावले उचलतील."(India-US Trade Deal)
पंतप्रधान मोदींनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादावर समाधान व्यक्त केले. त्यांनी अमेरिकेच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हटलं की, "यापुढे अमेरिकेत 'मेड इन इंडिया' उत्पादनांवर आता १८% इतके कमी शुल्क आकारले जाईल. मोदींनी या महत्त्वपूर्ण घोषणेबद्दल १४० कोटी भारतीयांच्या वतीने ट्रम्प यांचे आभार मानले.(India-US Trade Deal)
दोन मोठ्या आर्थिक शक्ती आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशांमधील हे सहकार्य लोकांच्या फायद्याचे ठरेल. त्यामुळे नवीन संधी निर्माण होतील. जेव्हा भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काम करतात तेव्हा या दोन्ही देशांतील साम्यंजस्य, जागतिक स्थिरता आणि समृद्धी वाढते, असे मोदींनी म्हटले.(India-US Trade Deal)
या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत भारताला स्पर्धात्मक लाभ मिळणार असून भारत-अमेरिका व्यापारसंबंध अधिक दृढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(India-US Trade Deal)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\