Sunetra Pawar: मोठी बातमी! पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच

03 Feb 2026 15:36:01
Sunetra Pawar 
 
मुंबई : (Sunetra Pawar) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री होते. मात्र विमान अपघातात त्यांच्या अकाली निधनानंतर या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. (Sunetra Pawar)
 
दरम्यान, आता राज्य शासनाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला असून, पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Sunetra Pawar)
 
हेही वाचा:  Pankaja Munde: मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; उड्डाणापूर्वीच...
 
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतानाच वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी सांभाळत पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या विकासावर विशेष लक्ष देत होते. त्यांच्या निधनानंतर या जिल्ह्यांच्या प्रशासकीय समन्वयासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. (Sunetra Pawar)
 
सुनेत्रा पवार यांच्यावर आता उपमुख्यमंत्रीपदासोबतच पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी येणार आहे. या नियुक्तीमुळे दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासन आणि विकासकामांना नव्या नेतृत्वाखाली दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Sunetra Pawar)
 
 
Powered By Sangraha 9.0