ठाणे : (Thane Municipal Election) ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक (Thane Municipal Election) आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत ठाणे शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची, तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली.(Thane Municipal Election)
आज (०४ फेब्रुवारी) सकाळी ११.३०वाजता ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते.(Thane Municipal Election)
हेही वाचा : Sunetra Pawar: मोठी बातमी! पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच
महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन व स्वागत केले.(Thane Municipal Election)