मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मालाड येथे सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी जखमी अवस्थेत आढळलेल्या नर सांबराचा 'वाईल्डलाईफ वेल्फे्अर असोसिएशन'ने (डब्लूडब्लूए) वन विभागाच्या मदतीने बचाव केला (borivali national park). या नर सांबराच्या शिंगामध्ये तारेची फास अडकल्यामुळे तो जखमी झाला होता (borivali national park). यानिमित्ताने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित क्षेत्रामध्ये शिकारीच्या प्रयत्नांसाठी अजूनही तारेच्या फासकीचा वापर सुरू असल्याचे समोर आले आहे. (borivali national park)
१ फेब्रुवारी रोजी मालाड येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बारिक पायरी गावातील आदिवासींना एक नर सांबर जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी याची माहिती लागलीच 'डब्लूडब्लूए'च्या स्वयंसेवकांना दिली. या सांबराच्या शिंगात तारेचा फास अडकला होता. त्यामुळे हा प्राणी जखमी झाला होता आणि त्या जखमेमधून रक्त वाहत होते. ज्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्याची गरज निर्माण झाली होती. म्हणून 'डब्लूडब्लूए'च्या स्वयंसेवकांकडून याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आली. उद्यान प्रशासनाने पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. निखिल बांगर यांना घटनास्थळी पाठवले. मात्र, तोपर्यंत सांबर जंगलात परतले होते.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी जंगलात शोधमोहिम राबवून जखमी सांबराला शोधण्यात आले. डाॅ. बांगर यांनी सांबराला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध केले. वैद्यकीय तपासणीवेळी त्यांच्या लक्षात आले की, सांबराच्या शिंगामध्ये अडकेली तार ही शिकार करण्यासाठी लावलेली फासकी असून ती तार कातडीमध्ये रुतली आहे. त्यामुळे डाव्या कानाच्या मागे अळ्या पडून त्याठिकाणी गंभीर जखम झाली आहे. यावेळी त्या सांबरावर तात्काळ उपचार करण्यात आले. कातडीत रुतलेली तार काढून त्याला पुन्हा जंगलात सुखरुप सोडण्यात आले. मात्र, यानिमित्ताने राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या वस्तीच्या नजीक शिकारीचे प्रयत्न होत असल्याचे समोर आली आले आहे.