मुंबई : (Sunil Ambekar) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर (Sunil Ambekar)यांनी वरळी येथे संपन्न होणाऱ्या "संघ प्रवासाची १०० वर्षे: नवे क्षितिज" या कार्यक्रमाची विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमास ९०० हून अधिक मान्यवर निमंत्रित असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवार, दि. ०३ फेब्रुवारी रोजी प्रेस क्लब मुंबई येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील आंबेकर यांनी माध्यमांशी याबाबत संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासह कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकर देखील उपस्थित होते.(Sunil Ambekar)
संघ शताब्दी वर्षात दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता येथे अशाच व्याख्यानमाला झाल्या असून मुंबईत होणारी ही व्याख्यानमाला या मालिकेतील शेवटचे पुष्प आहे. आधीच्या सर्व व्याख्यानमालांना मिळालेला प्रतिसाद हा अतिशय उत्साहवर्धक होता. वरळीच्या नेहरू सेंटर सभागृहामध्ये ७ आणि ८ फेब्रुवारी या दिवशी एकूण ४ सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत २ सत्रे तर, दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या कालावधीत २ सत्रे पार पडणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी सरसंघचालकांचे व्याख्यान तर दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरांचे सत्र होईल. या सत्रात सरसंघचालक उपस्थित मान्यवरांच्या शंकांचे निरसन करतील.(Sunil Ambekar)
सरसंघचालक आपल्या उद्बोधनात पंच परिवर्तनाचा विशेषत्वाने उल्लेख करतील, तसेच स्थानिक पातळीवर स्वयंसेवकांद्वारा होणारे कार्य याविषयी उपस्थितांसमोर विषय मांडतील, असे सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मुंबई आणि परिसरातील ९०० हून अधिक मान्यवरांना निमंत्रित केल्याची माहिती आहे.(Sunil Ambekar)
सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी देशभरात सुरू असलेल्या गृहसंपर्क अभियानाविषयी माहिती दिली. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात गृहसंपर्क अभियानास सुरू झाली. त्याचप्रमाणे मंडल स्तरावर हिंदू संमेलनांचे, सामाजिक सद्भाव बैठका आयोजित करण्यात आल्याचे सुनील आंबेकर यांनी सांगितले.(Sunil Ambekar)
निमंत्रितांचे १० श्रेणींमध्ये वर्गीकरण
निमंत्रितांचे एकूण १० श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये आर्थिक, न्यायिक, ॲडमिनिस्ट्रेशन, कला, क्रीडा, धार्मिक, राजकीय, कॉर्पोरेट, सिनेमा, इ. क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. गेल्या चार महिन्यांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.(Sunil Ambekar)
न्यायालयाचा निर्णय सर्वोपरी
यूजीसीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, समजात एकोपा राहिला पाहिजे, ही संघाची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळे सध्या युजीसीला स्थगिती मिळाली असली, तरी पुढे न्यायालय जो निर्णय घेईल तो सर्वोपरी असेल.(Sunil Ambekar)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक