Navnath Ban: ‘ऑपरेशन लोटस’ आरोपांवर भाजपचा पलटवार; नवनाथ बन यांचे राऊतांना सडेतोड उत्तर, म्हणाले, ‘उद्या न्यायालयाने...’

03 Feb 2026 11:56:38
 
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) “भाजपच्या विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला होता. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, भाजपचे माध्यम प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. (Navnath Ban)
 
नवनाथ बन म्हणाले की, “उद्या भूकंप, त्सुनामी किंवा पूर जरी आला तरी संजय राऊत त्यालाही ‘ऑपरेशन लोटस’चा भाग म्हणतील. आरोप करणे सोपे असते, पण पुरावे देण्याची जबाबदारीही असते.” राऊत यांनी केवळ आरोपांवर आधारित वक्तव्ये करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. (Navnath Ban)
 
हेही वाचा :  राष्ट्रीय अखंडतेशी खेळणार्‍यांना माफी नाही...
 
नवनाथ बन यांनी पुढे स्पष्टपणे सांगितले की, “अजित पवार यांचा विमान अपघात हा दुर्दैवी अपघात आहे, घातपात नाही, हे स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. तरीही संजय राऊत यांच्याकडून सातत्याने संशय पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” जर राऊत यांच्याकडे ऑपरेशन लोटस संदर्भात काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते माध्यमांसमोर किंवा तपास यंत्रणांकडे सादर करावेत, असे आव्हानही बन यांनी केले. (Navnath Ban)
 
“संजय राऊत यांचा भारतीय न्याय व्यवस्थेवरच विश्वास नाही. उद्या न्यायालयाने एखादा निकाल दिला, जो त्यांच्या सोयीचा नसेल, तर ‘न्यायालय विकलं गेलं आहे’ असं म्हणायलाही ते मागे-पुढे पाहणार नाहीत,” अशी खोचक टीका बन यांनी केली. (Navnath Ban)
 
 
Powered By Sangraha 9.0