मुंबई : ( Banke Bihari Temple ) उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील ठाकूर बांके बिहारी मंदिरात स्टील रेलिंग बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. हे कंत्राट एका मुस्लिम व्यक्तीला दिल्याने हिंदू समाजामध्ये तीव्र संताप आहे. श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश फलाहारी महाराज यांनी यावर आक्षेप घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांके बिहारी मंदिरात स्टील रेलिंग बसवण्याचे काम चालू आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कंत्राट काढण्यात आले होते. मात्र प्रशासनाने हे कंत्राट सलीम अहमद नावाच्या मुस्लिम व्यक्तीला दिल्याने श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष समितीने यावर तीव्र विरोध करत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली.
हेही वाचा : Himanta Biswa Sarma : जमियत उलेमा-ए-हिंदकडून हिमंत बिस्वा शर्मा यांच्याविरोधात न्यायालयात धाव
समितीचे अध्यक्ष दिनेश फलाहारी महाराज म्हणाले की, जर गोमांस खाणारे आणि सनातन धर्माचे विरोधक भगवान राधा कृष्ण यांनी महारस आणि माखन चोरी लीला ज्या ठिकाणी केली, जिथे बांके बिहारी विराजमान आहेत तिथे आले तर ब्रजचे लोक ते सहन करणार नाहीत, आमचा कृष्ण कन्हैया देखील रागावेल.
फलाहारी महाराज म्हणाले की, हे लोक सनातन धर्माच्या विरोधात आहेत. ते हिंदूंना काफिर म्हणतात. अशा लोकांना मंदिराच्या परिसरात एक किलोमीटर आत प्रवेश दिला जाणार नाही. स्टील रेलिंग बसवण्यासाठी हजारो हिंदू कंत्राटदार आहेत, मग हे कंत्राट ज्यांनी हिंदूंवर अत्याचार केले, मथुरा, काशी आणि अयोध्या नष्ट केली त्या मुघलांच्या वंशजांना का देण्यात आले.
मथुरेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी(एडीएम) पंकज वर्मा यांनी सांगितले की, हे रेलिंग मंदिराच्या बजेटमधून बसवले जात नाही, तर मंदिराचा निधी ज्या बँकांमध्ये जमा होतो त्या बँकांकडून बसवले जात आहे. बँकांनी त्यांच्या सीएसआर निधीतून प्रस्ताव सादर केला. बँकेने कोटेशनच्या आधारे कनिका कन्स्ट्रक्शनची निवड केली. प्रशासनाच्या मते ही संस्था रंजन नावाच्या व्यक्तीद्वारे चालवली जाते.