मुंबई : (Himanta Biswa Sarma) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांच्या अलीकडील मिया मुस्लिमांच्या विधानाविरुद्ध जमियत उलेमा-ए-हिंदने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. संघटनेचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी त्यांच्या विधानांना द्वेषावर आधारित सांप्रदायिकदृष्ट्या चिथावणीखोर आणि संवैधानिक मूल्यांचे उघड उल्लंघन असल्याचे म्हणत याचिका दाखल केली.(Himanta Biswa Sarma)
मौलाना महमूद मदनी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी २७ जानेवारी रोजी दावा केला होता की, चार ते पाच लाख मियां मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात येईल. त्यांनी असेही म्हटले की, आसाममधील मुस्लिमांविरुद्ध मियां हा शब्द अपमानजनक पद्धतीने वापरला जातो.(Himanta Biswa Sarma)
मदनी म्हणाले की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला आवाहन केले आहे की संवैधानिक पदाच्या नावाखाली कोणत्याही समुदायाला, भडकवण्याचा किंवा बदनाम करण्याचा अधिकार कोणालाही नाही याची खात्री करण्यासाठी संवैधानिक पदांवर असलेल्यांच्या भाषणांसाठी कठोर नियामक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत.(Himanta Biswa Sarma)
आपल्या राजकीय भूमिकेचा पुनरुच्चार करताना, शर्मा म्हणाले की ते कोणत्याही वैयक्तिक किंवा कायदेशीर आव्हानाला घाबरत नाहीत. मी मिया किंवा बांगलादेशातील घुसखोरांच्या मुद्द्यावर राजकारण करतो. माझ्याविरुद्ध खटला दाखल केला तरी मी घाबरणार नाही, असे ते म्हणाले.(Himanta Biswa Sarma)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.