Galwan Border Dispute : भारताची एक इंचही जमीन गेली नाही

03 Feb 2026 13:41:39
Galwan Border Dispute
 
मुंबई : (Galwan Border Dispute) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील एका लेखाचा हवाला देत भाजप सरकारवर टीका केली. यावर भाजपने नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारताने गलवान खोऱ्यात एक इंचही जमीन गमावलेली नाही.(Galwan Border Dispute)
 
लोकसभेत राहुल गांधी म्हणाले की, गलवान खोऱ्यात चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. जनरल नरवणे स्वतः त्यांच्या पुस्तकात लिहितात की, कैलास रिज पर्यंत चीनचे रणगाडे आले होते, डोकलाममध्येही पोहचले होते. राहुल गांधींच्या या विधानावर नरवणेंचा व्हिडिओ प्रसिद्ध करत भाजपने राहुल गांधी हे देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला.(Galwan Border Dispute)
 
हेही वाचा : India-US Trade Deal: अखेर ट्रम्प भारतापुढे नमले! अमेरिकेकडून 'मेड इन इंडिया' वस्तूंवरील आयात शुल्कामध्ये कपात
 
या व्हिडिओत नरवणे सांगत आहेत की, भारत आणि चीनमध्ये असे काही भाग आहेत ज्यावर दोन्ही देश दावा करतात. या भागात कोणत्याही खुणा किंवा खांब नाहीत. गलवानमध्ये चीनला पहिल्यांदा असे वाटले की सीमेवर रस्ता बांधण्यास विरोध होऊ शकतो. चीनने ३,००० किलोमीटरच्या अनिश्चित सीमेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने एक इंचही जमीन देण्यास नकार दिला.(Galwan Border Dispute)
 
सरकारने घाबरु नये, पुस्तक प्रकाशित करण्यास संमती द्यावी
 
डोकलामच्या वादाला आता ९ वर्षे उलटली आहेत. त्यावेळी चीनने स्पष्टपणे सांगितले होते की तुमची अवस्था १९६२ पेक्षा वाईट होईल. मात्र केंद्र सरकारने त्यांना ठामपणे उत्तर दिले की, आम्ही सगळ्या प्रकारे उत्तर देण्यास तयार आहोत. आम्हाला युद्ध नको आहे, शांतता हवी आहे. पण तुम्ही जर युद्ध सुरु केले तर आम्हाला युद्ध करावं लागेल आणि त्याचे परिणाम गंभीर होतील. त्यावेळी चीनचे सैनिकही मागे हटले नाहीत आणि भारताचे सैनिकही नाहीत. राहुल गांधींनी कैलास पर्वतांचा जो उल्लेख केला त्याबाबत मी इतकेच सांगेन की भारताचे पारडे चीनच्या तुलनेत जड होते. त्यामुळे मला वाटते की हे पुस्तक छापण्यास सरकारने संमती दिली पाहिजे.(Galwan Border Dispute)
पी. के सहगल
निवृत्त लष्कर अधिकारी
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0