मुंबई : (Minister Mangal Prabhat Lodha) जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ल्यातील डॉन बॉस्को इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.(Minister Mangal Prabhat Lodha)
मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठी कौशल्य विकासाचा भव्य आणि प्रेरणादायी दृष्टिकोन मांडत त्यांना नवी दिशा दिली आहे. याच संकल्पनेतून त्यांनी देशभरातील आयटीआयच्या अत्याधुनिकीकरणासाठी ६० हजार कोटींची 'पीएम सेतू योजना' योजना आखली आहे. महाराष्ट्रालाही त्याचा लाभ होणार असून पहिल्या टप्प्यात २४२ कोटी खर्च करून छत्रपती संभाजी नगर, पुणे आणि नागपूरच्या आयटीआयचे आधुनिकीकरण होणार आहे. हाच दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रभावीपणे अंमलात आणला जात आहे. पुढच्या काही दिवसात स्वयंरोजगार आणि स्टार्टअप्स करीता 'मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना' आकाराला आली आहे. या योजनेतून राज्यभरातील ५ लाख स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तरुणांना सामायिक ऑनलाईन चाचणीद्वारे निवड करून ५ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली जाणार आहे. त्याच्या व्याजाचा अर्धा भारही सरकार उचलणार आहे."(Minister Mangal Prabhat Lodha)
हेही वाचा : कॅनडात बांग्लादेशी अल्पसंख्याकांसाठी निदर्शने; हिंदू कॅनेडियनांचा सरकारला ठोस कारवाईचा आग्रह
शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
चीन मधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. त्याकरिता यांत्रिकी, वीज संच मांडणी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सेक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, दि. ३ आणि ४ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला असून राज्यस्तरावरील विजेते उमेदवार गांधीनगर, गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतून विजेते उमेदवारांची नावे पुढील आंतरराष्ट्रीय नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.(Minister Mangal Prabhat Lodha)
२०२९ ला भारतात जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन व्हावे
मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) पुढे म्हणाले की, "देशात सृजनशीलता असून कोणत्याही क्षेत्रात भारत यापुढे मागे राहणार नाही. कौशल्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भविष्य घडवण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रात पुढच्या वर्षभरात ऑलिम्पिकच्या धर्तीवर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव द्यावा. तसेच पुढच्या तीन वर्षात म्हणजेच २०२९ची जागतिक कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात होईल यासाठी जोरदार प्रयत्न करावेत."(Minister Mangal Prabhat Lodha)