मुंबई : (Bullet Train Project) पालघर जिल्ह्यातून धावणाऱ्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी (Bullet Train Project) एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. मंगळवार,दि.३ रोजी जिल्ह्यातील दुसऱ्या माउंटन टनेलमध्ये (एमटी-६) अखेर ब्रेकथ्रू साध्य झाला असून, हा क्षण केवळ अभियांत्रिकी यशाचा नाही तर देशाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा मैलाचा दगड ठरतो आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या साफल्य पूर्तीची थेट पाहणी केली आणि या यशाबद्दल प्रकल्पातील अभियंते व कामगारांचे विशेष अभिनंदन केले.(Bullet Train Project)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीचे कौतुक करत अभियंत्यांचे अभिनंदन केले. या ब्रेकथ्रू प्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी दृक्श्राव्य माध्यमातून उपस्थित राहत अभियंत्यांचे अभिनंदन केले. हा बोगदा तब्बल ४५४ मीटर लांब आणि १४.४ मीटर रुंद असून, बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही ट्रॅकसाठी एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे, एका महिन्याच्या आत पालघर जिल्ह्यातील हा दुसरा टनेल ब्रेकथ्रू आहे. याआधी एमटी-५ टनेलमध्ये दि. २ जानेवारी २०२६ रोजी ब्रेकथ्रू साध्य झाला होता.(Bullet Train Project)
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कस
एमटी-६ बोगद्याचे खोदकाम दोन्ही टोकांहून न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने करण्यात आले.अवघ्या १२ महिन्यांत हे खोदकाम पूर्ण होणे ही अभियंते आणि कामगारांच्या कौशल्याची साक्ष आहे. एकूण ५०८किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा आढावा घेताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले, आतापर्यंत ३३४ किमी लांबीचे पूल आणि ४१७ किमीचे पिअर (खांब) उभारण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. गुजरात राज्यातील कामाची गतीही चांगली असून तेथे ट्रॅक टाकणे आणि विद्युतीकरणाचे काम जोमाने सुरू आहे.(Bullet Train Project)
हेही वाचा : Women Farmers Empowerment : राज्याच्या ९ जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांना मिळणार शाश्वत शेतीचे प्रशिक्षण;
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाची वेगवान प्रगती
महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे (Bullet Train Project) काम अनेक पातळ्यांवर वेगाने सुरू आहे. वैतरणा नदीवरील सर्वात लांब नदी पूल पिअर स्तरापर्यंत पोहोचला आहे. उल्हास आणि जगणीसारख्या प्रमुख नद्यांवर फाउंडेशनचे काम सुरू आहे. चारही स्थानकांवर बांधकाम प्रगतीपथावर असून, राष्ट्रीय व राज्य महामार्ग ओलांडणाऱ्या ठिकाणी लांब पल्ल्याचे स्टील पूल उभारले जात आहेत. याशिवाय, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यानच्या २१ किमी लांब टनेलवरही काम वेगात सुरू आहे. सध्या पालघर जिल्ह्यात एकूण ७ माउंटन टनेल्सचे काम सुरू असून, त्यातील एमटी-5 आणि एमटी-6 या टनेल्सने ब्रेकथ्रू साध्य करून प्रकल्पाला नवे बळ दिले आहे.(Bullet Train Project)
अन्स्टोपेबल/ अथक महाराष्ट्र ! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बुलेट ट्रेनच्या (Bullet Train Project) प्रवासात महाराष्ट्राने आणखी एक मोठा टप्पा पार केला आहे. पालघरमध्ये अवघ्या एका महिन्यात दुसरा टनेल ब्रेकथ्रू! हे यश म्हणजे महाराष्ट्राची जिद्द, अभियांत्रिकी कौशल्य आणि जागतिक दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबतची ठाम बांधिलकी दर्शवते. वेग, विस्तार आणि शाश्वत विकास हेच महाराष्ट्राच्या प्रगतीचे मॉडेल आहे.(Bullet Train Project)