तेहरान: (US and Israel launch attack on Iran) अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर संयुक्त सैन्य कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या मोहिमेला “Major Combat Operations” असे संबोधले असून, इराणची मिसाइल व लष्करी क्षमता निष्प्रभ करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे माध्यमांवरून समजत आहे. हल्ल्यांदरम्यान तेहरानसह अनेक शहरांमध्ये स्फोट, धूर आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती आहे. (US and Israel launch attack on Iran)
इराणचे प्रत्युत्तर
इराणनेही तात्काळ प्रत्युत्तर देत ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांची मालिका सुरू केली. यूएई, कतार, कुवैत, बहरीन आणि इराकमधील अमेरिकेशी संबंधित तळांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. अबू धाबीमध्ये दोन मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. हरीनमधील अमेरिकन नौदल तळ रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. इराकमधील अमेरिकन तळांवरही हल्ले झाल्याचे समजत आहे. इराण आणि इराकने हवाई हद्द तात्पुरती बंद केली असून, मध्य आशियातील काही देशांनीही एअरस्पेस बंद केली आहे. (US and Israel launch attack on Iran)
ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त कारवाईनंतर पहिले अधिकृत वक्तव्य केले. “इराण कधीही अणुबॉम्ब बनवू शकणार नाही. त्यांची मिसाइल क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त करू. आम्ही आमचे वचन पूर्ण केले आहे,” असे त्यांनी म्हटले. तसेच इराणला शरणागती पत्करण्याचे आवाहनही त्यांनी केले. (US and Israel launch attack on Iran)
रशियाची टीका
रशियाकडून या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. “स्वतःला शांतिदूत म्हणवणाऱ्या ट्रम्प यांचे खरे रंग आता जगासमोर आले,” अशी टीका रशियन नेतृत्वाने केली आहे. (US and Israel launch attack on Iran)
भारताची नागरिकांना सूचना
परिस्थिती गंभीर होत असताना भारत सरकारने इस्रायलला प्रवास करण्यावर पुढील आदेश येईपर्यंत निर्बंध घातले आहेत. इराणमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (US and Israel launch attack on Iran)
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील घडामोडींवर जगाचे लक्ष लागले आहे. (US and Israel launch attack on Iran)