Mumbai journalist ambulance service: मुंबईत पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्बुलन्स; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

28 Feb 2026 18:11:24
 
Mumbai journalist ambulance service
 
मुंबई: (Mumbai journalist ambulance service) मुंबईत इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार-कॅमेरामन आणि संबंधित घटकांसाठी आता स्वतंत्र 'अॅम्ब्युलन्स' राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी या सेवेचे उद्धाटन करण्यात आले. (Mumbai journalist ambulance service)
 
हेही वाचा: Online Food Delivery: ऑनलाईन फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी सक्तीची
 
नवी मुंबईतील 'आरबीजी फाउंडेशन' आणि' टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन’च्या पुढाराकाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. विधान भवनाच्या आवारात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी योजनेचे मंत्री, भरत गोगावले, फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे, टीव्ही जर्नालिसस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, सदस्य मनश्री पाठक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. (Mumbai journalist ambulance service)
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पत्रकार हे अनेकदा अतिशय संवेदनशील ठिकाणी पोहोचून कव्हरेज करतात. त्यामुळे अपघात ओढण्याची भीती असते. अशावेळी पत्रकारांना हक्काची सेवा देण्यासाठी आरबीजी फाउंडेशन आणि टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचा ही योजना चांगली आहे. पत्रकारांसाठी अॅम्ब्युलन्स सुरू केली, हे स्तुत्य असले, तरी त्याची गरज येऊ नये," असे ते म्हणाले. (Mumbai journalist ambulance service)
 
 
Powered By Sangraha 9.0