‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची रंगतदार रंगपंचमी; रंग, नृत्य आणि हास्याचा जल्लोष!

28 Feb 2026 14:59:15

सोनी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या टीमने यंदाची रंगपंचमी जल्लोषात साजरी केली. “हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष उपक्रमांतर्गत सर्व कलाकारांनी एकत्र येत रंग, संगीत आणि नृत्याच्या ठेक्यावर उत्सव साजरा केला.

या सोहळ्यास कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी यांची उपस्थिती लाभली. तसेच समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, श्याम राजपूत, मंदार मांडवकर, शिवाली परब, रोहित माने, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर, ओंकार राऊत, अरुण कदम, निखिल बने, दत्तू मोरे आणि विराज जगताप या कलाकारांनीही उत्साहात सहभाग घेतला.







View this post on Instagram
















A post shared by Television Khabar (@television_khabar)


कलाकारांनी गाणी, डान्स आणि विविध धमाल खेळांच्या माध्यमातून रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. पारंपरिक तसेच धमाल गाण्यांवर रंगांची उधळण करत हास्याचा वर्षाव करण्यात आला. संपूर्ण वातावरणात उत्साह, मैत्री आणि आनंदाची रंगत पाहायला मिळाली.

या विशेष रंगपंचमी सोहळ्याची झलक लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.







View this post on Instagram
















A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)




Powered By Sangraha 9.0