तेहरान: (Israel Iran conflict 2026) २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलने इराणच्या राजधानी तेहरानमध्ये थेट क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामध्ये शहराच्या केंद्रीय भागात अनेक स्फोट झाले आणि भारी तणाव निर्माण झाला. हा हल्ला इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे केला असून, तेहरानसह इराणमधील अनेक सैन्य व इंफ्रास्ट्रक्चर तळांना लक्ष करत हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. (Israel Iran conflict 2026)
इस्रायलने “प्रतिबंधात्मक हल्ला” म्हणून ही कारवाई जाहीर केली असून संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी इराणकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. तेहरानच्या केंद्रातील अनेक ठिकाणी, तसेच इराणच्या इतर प्रमुख शहरांमध्ये (इस्फ़हान, करज, करमानशाह) एकाच वेळी अनेक धमाक्यांचे आवाज झाला असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनकडून मिळत आहे. (Israel Iran conflict 2026)
दरम्यान, इराणने देशभरात आणीबाणी जाहीर केली असून, हवाई क्षेत्र बंद केले आहे आणि नागरिकांना शहराच्या आतील भागांतून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तणाव आणखी वाढत असून, इराणने यानंतर इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती आहे; दोन्ही देशांनी देशातील नागरिकांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. (Israel Iran conflict 2026)