BKC Bullet Train Smart Development : बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाचा परिसर 'स्मार्ट' होणार!

27 Feb 2026 16:59:31
BKC Bullet Train Smart Development
 
मुंबई : (BKC Bullet Train Smart Development) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गिकेअंतर्गत स्थानक क्षेत्र विकास प्रकल्प (स्मार्ट)अंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल येथील मुख्यालयात उच्चस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा उद्देश स्थानक परिसर विकासासाठी तांत्रिक सहकार्याचा स्पष्ट आराखडा निश्चित करणे हा होता. यासाठी भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय तसेच जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.(BKC Bullet Train Smart Development)
 
नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गिकेत एकूण १२ स्थानके असून त्यापैकी चार बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर हे महाराष्ट्रात आहेत. स्मार्ट प्रकल्पअंतर्गत ठाणे व विरार स्थानकांना प्राधान्य देत स्थानकाभोवती नियोजित, शाश्वत आणि परिवहन-केंद्रित विकास साधण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात येत आहेत.(BKC Bullet Train Smart Development)
 
हेही वाचा : ST Corporation : ६० हजार एसटी सवलतधारकांनी घेतले एनएसीएमसी कार्ड 
 
या कार्यशाळेत जायकाच्या तज्ज्ञांनी जपानमधील ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, जमीन मूल्य हस्तगत, एकात्मिक वाहतूक नियोजन, पर्यावरणीय शाश्वतता, हितधारक सहभाग आणि स्थानक पुनरुत्थानात खाजगी क्षेत्राच्या सहभागासंबंधी आंतरराष्ट्रीय उत्तम पद्धती मांडल्या. एमएमआरडीएच्या नगररचना पथकासह झालेल्या चर्चेत ठाणे व विरार स्थानक क्षेत्र विकास आराखड्यांवर सखोल विचारविनिमय करून अंमलबजावणीचा कृती मार्गनकाशा आणि आंतरसंस्थात्मक समन्वयाच्या पुढील टप्प्यांवर चर्चा झाली. यानंतर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी एमएमआरडीए, ठाणे व विरार येथील संबंधित अधिकारी तसेच एनएचएसआरसीएल आणि जायकाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.(BKC Bullet Train Smart Development)
 
“हा उपक्रम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक मानकांनुसार विकसित, शाश्वत व परिवहन-केंद्रित विकासाचे अग्रगण्य केंद्र म्हणून घडविण्याच्या दृढ वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे.”(BKC Bullet Train Smart Development)
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
 
 
Powered By Sangraha 9.0