तेलुगू-कोडवा परंपरेत रश्मिका–विजय विवाहबद्ध; लग्नानंतरची पहिली झलक व्हायरल...

27 Feb 2026 16:58:15

Rashmika–Vijay Wedding

मुंबई : (Rashmika–Vijay Wedding) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी २०२५ रोजी विवाहबंधनात अडकले. आयटीसी मेमेंटोज येथे पार पडलेल्या या शाही सोहळ्यात तेलुगू आणि कोडवा या दोन्ही परंपरांनुसार विवाहविधी संपन्न झाले.

लग्नसोहळ्यात दोघांनीही पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य दिले असुन रश्मिकाने लाल रंगाची पारंपरिक साडी आणि सोन्याचे दागिने परिधान केले होते, तर विजयने ऑफ-व्हाईट धोतर, लाल शाल आणि पारंपरिक दागिन्यांसह आपला लूक पूर्ण केला. साधेपणा आणि पारंपरिकता यांचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात पाहायला मिळाला.

भावनिक पोस्टने वेधले लक्ष
 
लग्नानंतर रश्मिकाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत विजयबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. “मला खरं प्रेम करायला शिकवणारा, मोठी स्वप्ने पाहायला प्रेरणा देणारा आणि मनमोकळं जगायला शिकवणारा माणूस,” अशा शब्दांत तिने आपल्या पतीची ओळख करून दिली. तर विजयनेही आपल्या पोस्टमध्ये रश्मिकामुळे आयुष्यात ‘घर’ आणि ‘शांतता’ मिळाल्याची भावना व्यक्त केली. 

 

हेही वाचा : सोशल मीडियावर ट्रेंडिंग ‘बेबी पंच’ला अखेर मिळाला मायेचा आधार; व्हिडिओ व्हायरल

 

 

 
लग्नानंतरची पहिली झलक

 

लग्नानंतर प्रथमच दोघे एअरपोर्टवर एकत्र दिसले. रश्मिका लाल पंजाबी ड्रेसमध्ये, तर विजय को-ऑर्ड सेटमध्ये दिसला. दोघांनीही हात जोडून चाहत्यांचे अभिवादन केले. या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लवकरच त्यांच्या भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार असून चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


Powered By Sangraha 9.0