मुंबई: (Deputy Chief Minister Medical Assistance Cell) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी विविध शासकीय व धर्मादाय योजनांद्वारे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे. कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण, डायलिसिस, अपघात प्रकरणे अशा गंभीर उपचारांसाठी खालील ५ प्रमुख योजनांद्वारे मदत दिली जाते.
१) मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF)
मदत मिळणारे आजार:
- कर्करोग
- हृदय शस्त्रक्रिया
- किडनी/यकृत प्रत्यारोपण
- डायलिसिस
- मेंदू विकार
- नवजात शिशूंचे गंभीर आजार
- अपघातग्रस्त रुग्ण
पात्रता:
- वार्षिक उत्पन्न ₹१.५० लाखांपर्यंत
- रुग्ण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे:
- अर्ज नमुना
- तहसीलदार उत्पन्न दाखला
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- वैद्यकीय अहवाल
- रुग्णालय अंदाजपत्रक
- FIR (अपघात प्रकरणात)
- शासन समिती मान्यता (प्रत्यारोपण प्रकरणात)
अर्ज प्रक्रिया:
२) पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF)
पात्रता:
- वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपर्यंत
- खासदार शिफारसपत्र आवश्यक
आवश्यक कागदपत्रे:
- तहसीलदार उत्पन्न दाखला
- ₹१० स्टॅम्प पेपरवरील नोटरी शपथपत्र
- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र
- PMNRF अर्ज नमुना
- दोन पासपोर्ट फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- रुग्णालय अंदाजपत्रक
अर्ज सादरीकरण:
- दिल्ली येथे प्रत्यक्ष
- स्पीड पोस्ट
- खासदार कार्यालयामार्फत
-
३) श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट
मदत मिळणारे आजार:
- कर्करोग
- रक्तविकार
- GBS
- प्रत्यारोपण
- कॉकलियर इम्प्लांट
- हृदय शस्त्रक्रिया
- मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर उपचार
अटी:
- अर्जदाराचे नाव रेशनकार्डमध्ये असणे आवश्यक
- शस्त्रक्रियेपासून १० दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करणे बंधनकारक
आवश्यक कागदपत्रे:
- अनुदान अर्ज
- रेशनकार्ड
- उत्पन्न दाखला
- आधार कार्ड
- हमीपत्र
-
वैद्यकीय कागदपत्रे
४) श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास
मदत मिळणारे आजार:
- हृदय शस्त्रक्रिया
- मेंदू शस्त्रक्रिया
- किडनी/लिव्हर प्रत्यारोपण
- डायलिसिस
- हिपॅटायटिस-सी
- कॉकलियर इम्प्लांट
- कर्करोग
- अपघातग्रस्त रुग्ण
आवश्यक कागदपत्रे:
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- उपचार तपशील
- रुग्णालय अंदाजपत्रक
- उत्पन्न दाखला
- हमीपत्र
- रेशनकार्ड/रहिवासी पुरावा
महत्वाची माहिती:
५) Tata Trusts
अर्जदार:
- रुग्ण स्वतः किंवा जवळचे नातेवाईक
आवश्यक कागदपत्रे:
- फोटो ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- कमावत्या सदस्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- पगार पावती/आयकर विवरणपत्र
- मागील १ वर्षाचे बँक स्टेटमेंट
- रुग्णालय अंदाजपत्रक
- वैद्यकीय अहवाल
- हमीपत्र
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या महत्वाच्या सूचना
- अर्ज स्वतः रुग्ण किंवा नातेवाईकांनीच करावा.
- कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज करू नये.
- कोणालाही आर्थिक देणे-घेणे करू नये.
- अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो.
गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांसाठी या ५ योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहेत. योग्य पात्रता व संपूर्ण कागदपत्रांसह वेळेत अर्ज केल्यास लाखो रुपयांची मदत मिळू शकते. पात्र रुग्णांनी अधिकृत संकेतस्थळांवरून माहिती तपासून योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
(टीप: अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासावी.)