Pravin Darekar : पोलादपूर येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत निर्णय कधीपर्यंत घेणार?

26 Feb 2026 15:56:00
Pravin Darekar

मुंबई : (Pravin Darekar) पोलादपूर येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचा निर्णय कधीपर्यंत घेणार, अशी विचारणा भाजपा गटनेते व पोलादपूरचे सुपुत्र आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज सभागृहात बोलताना शासनाला केली.(Pravin Darekar)
 
सभागृहात सदस्य राजेश राठोड यांनी जालना जिल्ह्यातील मंठा येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. प्रश्नोत्तराच्या या चर्चेत सहभागी होत आ. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले की, जालना जिल्ह्यातील मंठा येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचा हा प्रश्न असून याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे. एमआयडीसी स्थापन करण्याचे नेमके निकष काय आहेत ? तसेचरायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत आम्ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या ठिकाणी जमीन आहे, पाणी आहे, वाहतुकीच्या सोयी आहेत आणि मनुष्यबळ देखील आहे. पोलादपूर येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत उद्योग विभागाने कोणता विचार केला आहे व याचा निर्णय कधीपर्यंत होईल ?(Pravin Darekar)
 
हेही वाचा : Palghar Healthcare Infrastructure Update : पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात संयुक्त बैठक घेणार  
 
दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सुरुवातीला एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचे निकष स्पष्ट केले. तसेच पोलादपूर येथे एमआयडीसी स्थापन करण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी अधिवेशन काळातच बैठक घेतली जाईल, असे आश्वस्त केले.(Pravin Darekar)
 
 
Powered By Sangraha 9.0